शुक्रवार 8 ऑक्टोबर 2010

मिडिया !

शेकडो चॅनल्स सर्फ करत असताना आपल्याला आवडेल असे काही दिसत नाही व उगाच आपण मिडियाच्या नावाने बोटे मोडत बसतो. मालिका असो किंवा बातम्या, नको नको ते दाखवले जाते. घरात वा समाजात कधिही न दिसणारी भांडणे किंवा भानगडी हे सर्व आपण कोणत्याही मालिकेत बघु शकतो. कालच कुठली तरी हिंदी मालिका बघत असतांना त्यातील कलाकार ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करित होते ते बघुन तर चॅनल बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. बातम्यांची पातळी तर बोलूच नये इतपत घसरलीय. चॅनल सुरु केले आहे तर ते चालवावे लागेल तर दाखवा जे काही शक्य आहे ते अशिच बहुदा मानसिकता असावी या चॅनल मालकांची.  TRP के लिए कुछ भी करेगा !
रेडिओ लावावा तर तेच, रेडिओ जॉकि नावाची नविन जमात असंबद्ध बडबड करण्यात तरबेज असते. मनात येईल ते वाट्टेल तितके बोलायचे व आपली वेळ संपली कि पुढच्याला बडबडण्यासाठी खो द्यायचा. हे सर्व चोवीस तास चालु द्यायचे.
समाजातही या सर्व मालिकांचे दुष्परिणाम दिसतात पण एक चांगला परिणाम पण झालाय ! ह्या शेकडो चॅनल्सना लागणारा कामगार वर्ग. एक चॅनल किमान दोनशे जणांच पोट भरते. एक मालिका तयार करताना स्पॉट बॉय पासुन सर्व कलाकार यांची संख्या २५० च्या वर जाते.  सर्व चॅनल्स धरलेत तर कमितकमी दोन ते तीन लाख माणसांचे पोट यावर अवलंबून आहे.
तर मालिका, बातम्या बघा अथवा बघू नका या सर्वांचे पोट भरतेय यात आनंद माना !

3 comments:

  1. हे मात्र अगदी खरं की बर्‍याच लोकांना या मालिका व रेडीओ चॅनल्समुळे रोजगार मिळाला आहे. इथे मेहनत आणि स्पर्धाही खूप आहे. अर्थात, प्रेक्षक म्ह्णून या गोष्टींकडे लक्ष फारसं जाणार नाही पण प्रत्यक्षात तिथे खूप यंत्रवत कामं चाललेली असतात.

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. पण यामुळे आक्रस्ताळेपणाने समाजजीवन पोखरले जाते त्यावर उपाय काय?
    पत्रकारांवरील हल्ल्याचे हे एक कारण आहे.

    प्रत्युत्तर द्याहटवा
  3. समाजजीवन पोखरायला मिडीया शिवाय बरेच घटक कारण आहेत. यात फक्त मिडीयाला दोष देण्यात अर्थ नाही. मिडीया एक त्यातला महत्वाचा घटक आहे हे मात्र खरे.
    समाजजीवन कस बदलत गेल आहे व त्याला काय कारण आहे हे माझ्या पुढच्या पोस्ट मध्ये मांडायचा प्रयत्न करतो. ते आपण सोमवारी वाचु शकता.

    प्रत्युत्तर द्याहटवा