गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

दिवाळी.

सर्वप्रथम या माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दिवाळी अत्यंत आनंदाची जावो हि शुभेच्छा.
काल मुलीची परिक्षा संपली. शाळेतुन तीला घरी आणताना मी नेहमी थोडा तयारीतच होतो, आज परिक्षा संपली चला आता मला फटाके घेऊन द्या अशी मागणी आल्यास तीला नाराज न करता सरळ तिच्या सोबतच दुकाना गाठायचे व म्हणेल त्यातले आवाज कमी करणारे फटाके घेवून द्यायचे हा सरळ हिशोब मी केला होता. पण तिने घरी आणे पर्यंत काही म्हटले नाही. त्यामुळे कपडे बदलून मी छान झोप काढली. उठल्यावर संकट आले तर माझी तयारी होतीच ! उठल्यावर बराच वेळ TV पहात आमच्या गप्पा झाल्या. बाहेर इतर मुलांचे फटाके उडवणे सुरु झाले, मी वाटच बघत होतो. बराच वेळ झाल्यावर मी मुलीला विचारले तुझी तब्येत बरी आहे ना ? ती हो म्हणाली ! परत थोड्या वेळाने मी दोन तीनदा हाच प्रश्न विचारला. तिनेही शांतपणे माझ्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. तिला कळेना बाबांना काय झाले, त्यामुळे रात्री जेवताना तिने डाव साधला व मलाच उलट प्रश्न केला, "बाबा तुमची तब्येत बरी आहेना ?" म्हटले का ? तर म्हणे तुम्ही शाळेतन आल्यापासुन मला हाच प्रश्न विचारत आहात ना ! आता मी विचारला तर काय झाले ?
आज सकाळी मीच तिला म्हटले चल आपण थोडे फटाके आणुया. आणि तिचे उत्तर ऎकून  मला आश्चर्याचा धकाच बसला, "नाही आणायचे" मी म्हटले का ? माझ्यावर काही राग आहे का ? तर म्हणे यावर्षीपासुन फटाके नाही उडवायचे कारण त्यामुळे आवाजाचे व हवेचे प्रदुषण होते, त्यामुळे फटाके बंद.
खरच, नविन पिढीला फक्त नावेच ठवणार्‍या माझ्या सारख्याला धक्का नाहीतर काय बसणार ? धक्क्यातुन सावरल्यावर मात्र जाणीव झाली, माझी मुलगी आता मोठी झाली आहे व समंजस पण ! आजपर्यंत मी शिकवत होतो आता मात्र मला शिकवायला माझीच मुलगी तयार झाली आहे. त्यामुळे आमची ही दिवाळी फटाक्यांशिवाय होणार !

२ टिप्पण्या:

  1. मस्तच, तुमच्या मुलीने समंजसपणा दाखवला,
    तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखसमाधानाची आणि आनंदाची जावो खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. सुहास,
    ब्लॉगवर प्रतिक्रिय़ा दिल्याबद्दल आभार. असेच भेट देत रहा.
    आपण सर्वांना पण दिवाळीच्या शुभेच्छा.

    अजय.

    उत्तर द्याहटवा