बुधवार, २९ जुलै, २०१५

देशभक्त X देशद्रोही : तुलना.

माणसाच कर्म कस असाव ?
माणुस गेल्यावर निदान काही दिवस तरी इतरांना, जे सगळे त्याच मार्गाला जायच्या रांगेत ऊभे आहेत, निदान काही दिवस तरी वाईट वाटाव.
डॉ. अब्दुल कलाम आपल्या कर्तुत्वाने अन अदबशिर वागण्याने जनमानसाच्या गळ्यातील ताईत बनलेत, त्यावेळेस लोकांनी हे बघितले नाही कि त्यांचा धर्म कोणता आहे.
लोकांना फ्क्त एकच माहित होत "हा एक बाप माणुस आहे." अन ज्या देशाबद्दल आम्हाला प्रेम आहे त्या देशाची मान जगात ऊंच ठेवण्या साठी हा माणुस झटत असतो. या माणसाच्या रक्तात देशभक्ती ठासुन मुरलेली आहे.
गेले दोन दिवस सर्व मिडीयात हा माणुस पुरुन ऊरला. लोकांना या बाप माणसाचे किती गुण गाऊ अन किती नको असे झालय.
थोडक्यात सांगायच तर "दोन दिवस भारतीय जनता दु:खच्या सागरात बुडालेली आहे."
एक थोर देशभक्त, वैज्ञानिक, खर्‍या अर्थाने नेता, कलाकार, रसिक, हाडाचा शिक्षक ...... अन बरच काही त्यांच्यात होत..... अन सर्वात मोठ्ठ होत ते माणुसपण.
डॉ. अब्दुल कलामांना ऎकण्याच व जवळुन बघण्याच परम भाग्य मला लाभलय.
.
.
.
दु:खात बुडालेल्या भारतीय जनतेला सुखावूना जाणारी एक झुळुक आज दुपारनंतर प्रसार माध्यमां मधे आली अन परत फेसबुक सारखी माधमे एका दुसर्‍या लाटेने भरुन गेली.
उद्या सकाळी एका देश द्रोह्याला फाशी होणार हिच ती झुळूक.
.
देशभक्ताच्या जाण्याने दु:खात बुडालेल्या जनतेला देशद्रोह करणार्‍याला फाशी होणार म्हणताच काही प्रमाणात तरी आनंद झालाय.
काळाचा महिमा तरी कसा, दोघेही उद्या याच देशाच्या मातित सामावले जाणार आहेत.
— © Ajay Bhange

२६ जुलै : एक प्रवास.

२६ जुलै २००५ .
बघता बघता दहा वर्षे झालीत.
मनावर कोरली गेलेली एक तारीख.
लाडकी मुंबापुरी जलमय झाली होती.
एक वाजल्या नंतर पावसाने जोर धरला व दुपारी तीन वाजता मी घराच्या दिशेने निघालो, सोबत हात धरून एक एकदाच भेटलेली गुजराती "बहन" होती.
घाटकोपरच्या पंतनगर मधुन हाय वे ला येऊ व जमेल तसे घरी पोहोचू इतका साधा हिशोब होता.
पण........
पंतनगरला अर्धा किलोमीटर चालताना पाण्याचा वाढलेला जोर व पातळी (थोड्याच वेळात छाती एवढे) बघता, २७ तारीख दिसेल याची खात्री वाटेना.........
अन.............
मन म्हणत होत....... हरायच नाही............ जगायच आहे ........ खुप जगायच आहे........
आपल्या मागे तिघी आहेत...........
त्यांच काय होईल.
या एकाच विचाराने फक्त जीव वाचेल याची काळजी घेत पुढे चालत राहिलो.
अन,
बातमी आली
पुढच्या गटारात सात जण वाहून गेलेत..... पुढे जाऊ नका.
अरे बापरे.......... आता काय होणार........
समोर एक BEST ची बस दिसली, तो पर्यंत मोबाईल पाणी गेल्याने बंद पडलेला.
कस तरी बस मधे चढलो.
रात्री अकरा वाजता बस मधिल एकाचा मोबाईल वाजला, अन जिवात जीव आला.
पाण्याची पातळी वाढतच होती, आता फक्त सिट वरच पाणी यायचे बाकी होते.
अन त्या भल्या माणसाने आवाज दिला, "मेरा मोबाईल चालु है किसीको अपने घर फोन करना है तो मेरा मोबाईल ले सकते हो."
घरी फोनवर "सांगितले मी जीवंत आहे, काळजी नसावी." ११.२० झाले होते तेंव्हा.
बस इतकेच बोलून फोन ठेवला अन....
परत पाऊस वाढला.
धिर सुटत चालला होता.....
बायको अन मुलींचे चेहरे समोर येत होते....
अन
समोर येत होते आणखी एक चित्र.........
स्वत:च्या फॊटॊला हार घातला आहे अन सगळे रडत आहेत.....
पण तसे होणे नव्हते...
पाण्याची पातळी रात्री तीन नंतर कमी होत गेली, थोड्या वेळातच "दोन जण डोक्यावर डबे घेऊन बसकडे येताना दिसले.
संकटात असावे या समजातुन त्यांना हात पुढे केला तर कळले "ब्रह्मकुमारी"चे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी डब्यात आमच्या साठी खायचे साहित्य आणले आहे.....
रात्री तीन वाजता एक पोळी, भाजी आणी शिरा मिळाल्यावर म्हटले वाचलो.
सकाळी सहा वाजता घराच्या दिशॆने मार्गक्रमण सुरु केले, दहा वाजता ठाण्याला पोहोचलो, अठरा किलोमीटर चालत.
घरी पोहोचताच तिघींना पहातच बांध फुटला, अन ............
मनसोक्त रडलो..... तिघीना कवटाळून...... !
होय, जीव वाचल्याचा आनंद होता, पण किती लोक घरी पोहोचू शकले नाहीत याची काळजीही होतीच.
आज दहा वर्षांनी ...... बघितले तर ...... माणुस तसाच आहे ........ गटारे तुंबतील याची पुरेपूर काळजी घेणारा.............. अन महापालिकेला जबाबदार धरणारा........... !
परत असले दृष्य बघायला नको वाटते.
पण जोरदार पाऊस आला कि धडकी भरते व न कळतच आठवते २६ जुलै २००५.
अजय भांगे....
(२६ जुलैला मी फेसबुक वर पोस्ट केलेला लेख)