रविवार, ४ जुलै, २०१०

माझाही प्रयत्न.

श्री. महेंद्र कुलकर्णींच काय वाटेल तेहेमंत आठल्ये, चंद्रशेखर यांच अक्षरधूळ , दिनेशच सर्वोत्तम मराठी विनोद व अनिकेतचा भूंगा वाचतांना वाटायच आपणही काही लिहाव. तसही कॉलेज मध्ये फळ्यावर लिहीण्या शिवाय कधि काही लिहून बघितल्याच आठवत नाही.
पण लिहीणार तरि काय ?
कालच महेंद्रच पोस्ट वाचतांना मात्र वाटल विषयाच बंधन न ठेवता लिहीत जायच. कुणाला आवडल तर ठिक अन्यथा आपल्याला लिहायची तर सवय होईल ! त्यासाठीच नाव निवडल आ सेतू हिमाचलम...
हा ब्लॉग तयार करण्यापूर्वी आणखी एक महत्वाच म्हणजे मराठी कसे टाईप करणार. यासाठी मदतीला आपलेच काही ब्लॉगर मित्र होतेच ना मदतीला ! त्यांचे पोस्ट वाचून बराहा डाऊनलोड केल थॊडी सवय होत पर्यंत लिखाण करुन बघितल.
बघा आपल्याला आवडल तर जरुर अभिप्राय द्या नावडल्यास तसे कळवा.

२ टिप्पण्या:

  1. अभिनंदन!! आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा... लिहित रहा.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद महेंद्र ! मला खात्री होती. आपली प्रतिक्रीया नक्कीच मिळेल. असेच भेटत जा, प्रोत्साहन आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा