सोमवार, १२ जुलै, २०१०

आठवण.

कुणाचे निधन झाल्यास घरातले, जवळचे नातेवाईक वा मित्रमंडळी त्या व्यक्तिचे गुण गात चार दिवस रडतात. त्यानंतर सर्वच आपल्या संसारात मग्न होतात ते नविन व्यक्तिचे निधना पर्यंत.....


काय असते या रडण्यामागचे कारण.
१. गेलेली व्यक्ति फारच चांगली होती.
२. त्या व्यक्तिचे आपल्यावर फार उपकार होते.
३. त्याच्या किंवा तिच्या शिवाय आपले जगणे अवघड होणार असते.

कि

४. ती व्यक्ति जीवंत असताना आपण त्या/तीच्यासोबत वाईट वागलो, तसे वागायला नको होते याची जाणीव झाल्यामुळे ?

२ टिप्पण्या:

  1. शेवटचं कारण जास्त प्रमाणात खरं असावं असं वाटतं, नाही?

    उत्तर द्याहटवा
  2. गप्पा मारताना एकदा माझ्या मित्रांमध्ये हा विषय निघाला होता व त्यात एकाने हा मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळे मी शेवटचा मुद्दा लिहीला.
    माझ्या ब्लॉगला भेट देऊन टिप्पणी केल्याबद्दल आभार.

    अजय.

    उत्तर द्याहटवा