परवा रविवारी संध्याकाळी फिरायला जाताना रस्त्यातले खड्डे चुकवता चुकवता एका बेसावध क्षणी एका खड्ड्यात पाय पडला ! पाय पडताच तो मुरगळला, त्यामुळे गेले तीन दिवस पाय दुखीने त्रस्त होतो व आज कॉलेजला गेलोच नाही. सहसा मी सकाळी email चेक करायच्या भानगडीत पडत नाही. संध्याकाळी घरी आल्यावर ते काम निवांत करता येते. आज घरी असल्यामुळे सकाळी ई-मेल बघायला बसलो तर त्यात Indianblooddonors ची मेल बघितली. माझा बदललेला मोबाईल क्रमांक त्यांना कळवलेला नसल्याचे आठवले व त्या प्रमाणे नविन क्रमांक त्यांच्याकडे रजिस्टर केला.
श्री. खुश्रु पोचा
http://www.indianblooddonors.com/ ही साईट नागपुरच्या खुश्रु पोचा व त्यांच्या पत्नि दोघे चालवतात. १९९९ मध्ये रक्त न मिळाल्याने त्यांना एका दुखद प्रसंगाला सामोरे जावे लागले, त्यानंतर दोघांनी ही साईट सुरु करुन आपले सर्वस्व, कुणाला रक्त न मिळाल्याने अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागु नये यासाठी अर्पण केले व आज पर्यंत अनेकांना या सेवेचा लाभ झाला आहे. (पोचांबद्दल परत कधितरी लिहीन.)
माझा नविन मोबाईल क्रमांक त्यांना कळवताच एक SMS आला, परत रक्तदान करणार का ? मी हो असे उत्तर देताच थोड्यावेळातच एक फोन आला, आपण रक्तदान करायला तयार आहात असे आपण कळवले आहे आत्ता येत असाल तर चांगले होईल. मी येतो म्हणताच त्यांनीच सांगितले एका दिड वर्षाच्या मुलीला रक्ताची तातडीची गरज आहे कारण तिला Thalassemia झालेला आहे व तिला रक्त देणे गरजेचे आहे.नियमीत रक्तदाता असल्याने रक्त देणे इतकेच माहित होते. ते कुणाला देण्यात येणार याचे मला काही कर्तव्य नव्हते. पण आज दिड वर्षाचे वय ऎकताच राहवले नाही व परत एकदा रक्तदानाचे पुण्य कमावता आले.
रक्तदान काही तथ्ये:
१. १८ वर्षाच्या वर असलेला व ५० किलोच्या वर वजन असलेला कुणीही रक्तदान करु शकतो.
२. आपल्या अंगात सुमारे ६ लिटर रक्त असते, त्यातील फक्त ३५० मिली रक्त काढण्यात येते जे पुढील ४८ तासात परत तयार होते.
३. रक्तदान केल्याने कोणताही थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही.
४. रक्तदान केल्यावर परत रक्त तयार होण्यासाठी कोणतेही औषध घ्यावे लागत नाही.
५. रक्त अतिशय सुरक्षीत पद्धतीने काढण्यात येते.
तर बघा आपले रक्त कुणाच्या कामी आले व त्याचा जीव वाचवता आला तर.
SMS Now ! A Life Depends on it.
Want to Donate Blood
SMS BLOOD (Std Code) (Blood Group) To 09665500000
Need Blood Donors
SMS DONOR (Std Code) (Blood Group) to 09665500000
मलाही या साईटचं निवेदन आलं आहे. नाव द्यायचंय तिथे. पायाची काळजी घ्या. हयगय करू नका. लवकर बरे व्हा.
उत्तर द्याहटवाधन्यवाद कांचन,
उत्तर द्याहटवापायाची काळजी घेतच आहे. दुखणे आहेच लवकर जाईल असे वाटते. आपणही Indian Blood Donors वर रजिस्टर करावे किंवा ठाण्याला आल्यावर कै. वामनराव ओक रक्तपेढीला भेट देवून तिथे रक्तदान केले तरी चालेल. मी आपल्याला वामनराव ओक रक्तपेढी दाखवायची व्यवस्था करु शकतो !