घरी दोन तीन भाऊ बहिण, शेजारीच काका काकू, चुलत भाऊ बहिण, पलिकडे जुने वडिलांचे स्नेही ज्यांना काकाच म्हटले जायचे, शाळेत वर्गात ३५/४० मुले/मुली शिक्षकांना सर्वांची नावेच नव्हेत तर घरी कोण आहेत याची माहिती असायची, अशा वातावरणात मुलांकडे / मुलीकडे लक्ष देणारे बरेच असायचे. त्यामुळे जरा काही वाकड वागल तर घरी संध्याकाळी पाठिवर फटाके फुटायचे, शिमगा व दिवाळी एकाच दिवशी !
जरा मोठे झाल्यावर न कळणारी पण शासनाच्या कृपेने सर्वत्र झळकणारी जाहिरात बघायला मिळायची, "छोटे कुटूंब सुखी कुटूंब". पत्र्यावर छापलेली व भिंतीवर गेरुने रंगवलेली हि जाहिरात त्यावेळी हमखास दिसायची.
छान होते ते दिवस. फारशा सोयी नव्हत्या पण सर्वच सुखी दिसायचे. सणासुदीला घरी जेवायला कुणीतरी असायचेच. मजा यायची त्या पंगती बघताना. कधितरी त्या पंगतीत वाढायला मजा यायची. पुढे पुढे हे सर्व कमी झाले. सख्खेच लांबच्या गावाला नोकरिला. गावात फक्त आई वडिल आणि दोन बछडे, हाच संसार, हेच विश्व. कालांतराने आई पण घर खायला ऊठते म्हणुन किंवा शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणुन नोकरिला.
आईच्या हातचे फक्त सणाला, इतर वेळेस शेजारच्या वाण्याकडून मॅगी आणले कि दोन मिनीटात तयार, घरी कंटाळा आल्यावर मित्रांसोबत खेळायला मजा यायची. त्यानंतर एका मोठ्ठ्या राक्षसाने घराघरात प्रवेश केला पण हा राक्षस संध्याकाळी काहिच वेळ दिसायचा त्यामुळे सर्वांचे लक्ष घड्याळाकडे असायचे. हा TV नामक राक्षस काही वेळ खाऊन बंद व्हायचा, चांगली करमणुक करायचा. काही वर्षांनी या राक्षसाने आपली पकड अधिकच घट्ट केली. जेमतेम चार तास खाणारा हा राक्षस चोवीस तास घरातच रहायला लागला. तेथेच समाजजीवनाच्या बदलाची सुरुवात झाली. मुलांचे घराबाहेर खेळणे कमी झाले व TV समोरचा वेळ वाढायला लागला. समोर कुरकूरे व TV, येथेच आयुष्याच्या कुकूरीने पण सुरुवात केली. चोवीस तास TV वर काय दाखवायचे ? हा एक मोठ्ठा पश्न निर्मात्यांपुढे. ते तरी काय करणार. हा प्रश्न सोडवायला त्यांनी पण अतिशय आक्रमकतेने आपले कार्यक्रम राबवणे सुरु केले. पोट भरायला प्रतिस्पर्ध्या पुढे रहायला हवेच यातुनच या TV चॅनल्सचा आक्रस्ताळेपणा वाढायला लागला. बातमी कशा प्रकारे कव्हर करायची याला धरबंध राहिला नाही व मालिकां मध्ये तोचतो पणा जाणवायला लागला. रियालिटी शो ने तर सर्वच बंधने झुगारलेली दिसतात.
माझाही अनुभव असाच.
उत्तर द्याहटवालहानपणी खेळण्या बागडण्यात जे सुख होतं, ते कुनीतरि आपसुक हिरावुन घेतले आहे..
विज्ञानाने मानुस खरच सुखी झाला की नाहि ?
ह्याचं उत्तर तुम्हि दिलंच आहे.
धन्यवाद, माझ्या ब्लॉगवर येऊन टिप्पणी दिल्याबद्दल.
उत्तर द्याहटवा