श्रावण अमावस्या म्हणजेच पोळ्याच्या दुसर्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. या दिवशी काळी, पिवळी मारबत तसेच बडग्याचा, सहा ते आठ फुट उंचीचा, पुतळा कागद, बांबू व कापड वापरुन तयार करण्यात येतो. या पुतळ्यांची सकाळी सात आठच्या सुमारास पुजा करण्यात येते व मिरवणुकीने हे पुतळे गावाबाहेर नेऊन जाळण्यात येतात वा तलावात विसर्जीत करण्यात येतात.
पिवळी मारबत
मिरवणुकीत त्या त्या वर्षीच्या सामाजिक प्रश्नांवर आधारीत घोषण्या दिल्या जातात. या घोषणा फारच मजेशिर असतात जसे महागाई वाढली तर "महागाईले घेवून जा गे मारबत." किंवा "स्वाईन फ्लू ले घेवून जा गे मारबत." अशा मोठ्य़ाने व अति उत्साहात नारे देत मिरवणुक ढोल ताश्यांच्या गजरात नागपुरात फिरते.नागपुर सोबतच जवळच्या गावात मारबतीची मिरवणुक निघत असली तरी नागपुरातली मिरवणुक बघायला बरीच गर्दी होते.
काळी मारबत