मला माहितेय मी फार चांगला लेखक नाही. पण लिहून बघायला काय हरकत आहे या विचाराने हा ब्लॉग सुरु केला. लिहीता आल तर ठिक अन्यथा एक दिवस बंद करणे आपल्या हातात आहे ना ! माणुस असल्याने मलापण भावना आहेतच, त्याच भावना येथे उतरवतोय. वाचकांना आवडल्यास नक्किच टिप्पणी देतात न आवडल्यास तसेही सांगतात. यामुळे इतरांचे विचारही कळतात. आपले विचार चुकिचे असल्यास बदलायला तितकाच वाव.
या ब्लॉगवर लिहायला सुरुवात केली ४ जुलै २०१० ला. वाटले नव्हते कि वाचकांचा १०० आकडा पार करेल. पण आजचा १०००+ आकडा बघितला व चांगले वाटले. फार समाधान नाही कारण काही मोजक्याच प्रतिक्रीया मिळाल्यात. प्रतिक्रीया कमी असल्याने मी जे लिहीतोय ते इतरांना आवडते की नाही हे कळायला मार्ग नाही.
१००० चा आकडा गाठायला ज्यांची मदत झाली त्या सर्वांचे मनापासुन आभार !