माकड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माकड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ सप्टेंबर, २०१०

माकड.

एक जंगल होत. त्यात एक कुत्रा रहायचा. एकदा काय झाल त्या कुत्र्याने वाघाला त्याच्याचकडे येताना बघितले. कुत्रातर घाबरलेला होता पण त्याने हिंमत करुन जवळच पडलेल हाडकू चघळायला सुरुवात केली. वाघ जवळ आलेला बघितल्यावर कुत्रा जोरात म्हणाला,"काय चवदार वाघ होता," आणि वाघाला ऎकू जाईल इतक्या मोठ्याने ढेकर दिली.
वाघाने त्याचे ऎकले व म्हणाला,"अरे हा तर वाघाला खाणारा कुत्रा दिसतोय, इथुन गेलेले बरे. उगाच जीव जाईल."
जवळच्या झाडावर एक माकड बसले होते. ते माकड सर्व बघतच होते. त्याला वाटले आपण सर्व खरखर वाघाला सांगीतल तर वाघासोबत मैत्री होईल व जंगलात आपल्याला कोणताही धोका रहाणार नाही.
माकड उड्या मारत मारत वाघाच्या दिशेने निघाले. थोड्या अंतरावरच त्याने वाघाला पकडले व खर काय ते त्याला सांगीतले.
वाघ म्हणाला अस व्हय, बघतोच त्या कुत्र्याला आता. वाघाने माकडाला पाठिवर बसवले व दोघेही निघाले कुत्र्याच्या दिशेने.
वाघाला परत आपल्या दिशेने येताना बघून कुत्रा पुन्हा हाड चघळायला लागला. ते जवळ आल्यावर मोठ्ठ्याने ओरडला अरे किती वेळ झाला, माकड वाघाला घेऊन परत आला नाही. मला तर फार भूक लागलीय. एक चांगला वाघ खायला मिळायला हवा.



तात्पर्य : आपल्या सोबत असे बरेच माकड असतात. त्यांना ऒळखून रहावे !