मार्च महिन्यात दहावीची परिक्षा संपल्यावर विद्यार्थी निकाल व त्यानंतर हवा तिथे प्रवेश मिळेल कि नाही या मानसिक दडपणाखाली असतात. जवळपास सहा महिने रिकामे राहून मानसिक दडपणाखाली रहाण्याच हे वय नाही. यावर उपाय काढायला शासन स्तरावर तसेच शैक्षणीक क्षेत्रातील अनुभवी जाणकार प्रयत्नात असावेत त्यामुळेच यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बरिच सुरळीत पार पडली. तरिही या प्रक्रियेला लागणारा अकून कालावधी बघता यावर यापेक्षा चांगला तोडगा निघायला हवा असे वाटते.
अभियांत्रिकी प्रवेश ज्याप्रकारे केंद्रिभूत पद्धतीने केले जातात तसे अकरावी साठी अवलंबण्यात आले आहेत. पण अजुनही ते बरेच वेळखाऊ वाटतात तसेच त्यानंतर बारावी नंतर परत याच पद्धतीचा वापर करुन अभियांत्रीकी प्रवेश देण्यात येतात. या दोन्ही पद्धतींचा एकूण विचार केल्यावर असे वाटते कि ही पद्धत अधिक सुकर करण्यात यावी.
मागील ५ - ६ वर्षे या पद्धतीचा अभ्यास केल्यावर असे वाटते कि यात बरीच सुधारण करणे शक्य आहे. ही नविन पद्धत तयार करताना एक विचार असा आला कि विद्यार्थी जेथे रहातो त्या ठिकाणा जवळच्याच शाळा - महाविद्यालयात त्याला प्रवेश देण्यात आला तर वाहतुकीची समस्या पण काही अंशी सुटेल. कोणत्याही विद्यार्थ्याला गच्च भरलेल्या लोकल किंवा बसने प्रवास करावा लागू नये ह्याचा विचार पण करण्यात आला.
या समस्येवर सुचलेला उपाय दर आठवड्याला एक भाग या तर्हेने पोस्ट करण्यात येईल. सर्वांना विनंती करतो कि आपल्या सुचना अवश्य कळवाव्यात.